धाराशिव प्रतिनिधी -विजय कानडे, दि.15 ऑगस्ट: आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जि. प. केंद्रीय प्राथ. शाळा व कन्या शाळा तेर येथे अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी तेर नगरीचे प्रथम नागरिक, सरपंच मा. नवनाथजी नाईकवाडी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. माधव मगर, मा.काकासाहेब मगर, उपाध्यक्ष श्रीमती.पूजा रोहीदास, माता पालक सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यावेळी मोठ्या उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यीनीनी विविध वेशभूषा सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्रीअनंत हाके सर,कन्या शाळा मुख्याध्यापक श्रीम. सुरेखा कदम मॅडम यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कु.हर्षदा गोरोबा पाडुळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. पाडुळे सरांनी विद्यार्थ्यांना लाडू वाटप केले. श्रीम. अन्सारी मॅडमनी मनोगत व गीत गायन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीम.विमल मक्तेदार मॅडम, श्रीम.प्रतिभा जोगदंड मॅडम, श्रीम. पल्लवी पवार मॅडम, श्रीम. ज्योती गाढवे मॅडम, श्री. रामहरी पसारे सर व शिक्षकानी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सुशिल क्षिरसागर सर यांनी केले.