दौंड प्रतिनिधी (सुनील डंगाणे) :- भारतीय स्वातंत्र दिनाचा अमृत महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा करताना ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि राजेश्वर विद्यालय याच्या माध्यामातुन विविध शालेय उपक्रमाचे आयोजन करून चैतन्यमय वातावरणात साजरा केला. त्यामध्ये राजेश्वर विद्यालयातील व जिल्हा परिषद शाळेतील मुलामुलींनी देशभक्तीपर कार्यक्रमातुन देशभक्ती च स्फुलिंग जनमनात जागवल विविध क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विद्यालयाचे वतीने प्रस्ताविक पर विचार व्यक्त करताना मुख्याध्यापक होले सरांनी विद्यालयाची यशोगाथा कथन केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करताना गावातील प्रथम डॉ. कन्या मेंगावडे, मोरे यांना सन्मानीत करण्यात आले समारोपाप्रती बालचमुना खाऊ वाटप करून वंदे मातरम सांगता करून जल्लोषात अमृत महोत्सव पार पडला