पुणे जिल्हा प्रतनिधी- ( सिद्धु खुटेकर ) दि.15 ऑगस्ट : मराठवाडा विभाग अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली व लोहगाव नगरीचे सुपुत्र व उद्योजक,श्री सुनिल बनसोडे साहेब यांनी दि-15 ऑगस्ट 2022 रोजी मातोश्री जिजामाता विद्यालय लोहगाव या विद्यालयास 12000 रु चा स्पिकर सेट भेट दिला.
व इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. व इयत्ता आठवी ते बारावी प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना 1111 रु बक्षीस व ट्राॅपी, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले विद्यार्थ्यांना खावु वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करण्यात आला.
विद्यालयाचे मु.आ. श्रीमती प्रतिभा पवार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामपंचायत लोहगाव ता. तुळजापूर यांनी मान्यवरांचा ऋण व्यक्त केले..