Disha Shakti

Uncategorized

महाराष्ट्र सिव्हिल फोर्स आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापनाच्या जवानांचा खंडोबा गडावर तिरंगा उत्सव व भंडारा उधळत दिला भारतमातेचा नारा

Spread the love

पुणे जिल्हा प्रतनिधी (सिद्धु खुटेकर) जेजुरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोउत्सवा निमित्त भारतीय लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर महाराष्ट्र सिव्हिल फोर्स आपत्ती आणि सुरक्षा व्यवस्थापन चे प्रमुख जयपाल दगडे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कमांडो परेड करीत भंडारा उधळण करून तिरंगा ध्वज उत्सव साजरा केला. यावेळी प्रवीण सरकाळे,सोमनाथ जिल्हेवार,सागर पाटील,सोमनाथ सुतार, सौरभ माने, सुनील क्षत्रिय तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश धर्म कैलास सिंगणे, आदींनी सहभाग घेतला होता.

राज्य सिव्हिल फोर्स आपत्ती आणि सुरक्षा व्यवस्थापन च्या माध्यमातून सदर कमांडो जवान देशसेवेच्या माध्यमातून विविध राज्यातील आपत्ती प्रसंगी तातडीची सुविधा पुरवीत नागरिकांच्या सेवेत रुजू होत असतात भारत सरकारच्या घरघर तिरंगा या उपक्रम अंतर्गत जेजुरी गडावर 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनी दाखल झाले होते.

यावेळी त्यांनी मराठी चा झेंडा अटकेपार करणाऱ्या शूर विर सरदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृती स्मारकही भेट दिली. यावेळी मल्हारराव होळकर छत्री मंदिराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त मानुया करिता सामाजिक कार्यकर्ते योगेश धर्म आणि जयपाल दगडे पाटील यांनी प्रार्थना ही केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!