राहुरी शहर प्रितिनिधी (नाना जोशी) दि.18 ऑगस्ट : राहुरी शहरातील रिप्बलिकन सेनेमध्ये नविन पदाधिकारी यांचे पदार्पण रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा व इंदू मिलचे प्रणते आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आदरणीय आयुष्यमान किरण भाऊ घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गाव तेथे शाखा या संकल्पनेतून रिपब्लिकन युवा सेनेची संघटनात्मक बांधण्याचे काम अश्वगतीने चालू असताना याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आयुष्यमान चंद्रकांत जाधव यांच्या अध्क्षतेखालील जिल्हा महासचिव आयुष्यमान अमोलजी मकासरे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे नेते व आमचे सल्लागार गंगा नाना विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 18-08-2022 रोजी राहुरी शहरा जवळ असलेल्या संत गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये बैठक झाली.
बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्षपदी आयुष्यमान दीपक हरिभाऊ भालेराव यांची नियुक्त पत्र देऊन त्यांच्यावर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन युवा सेना वाढीच्या कामाच्या संदर्भात जबाबदारी देण्यात आली त्याच प्रमाणे राहुरी तालुका प्रसार माध्यम प्रमुख पदी आयु उत्तम पवार यांची नियुक्ती करण्यात आली ताराबाद येथील ग्रामसेवक आदरणीय पटेकर साहेब त्याचप्रमाणे वांबोरीहून उपस्थित असलेले प्रमोद जी मकासरे कॉन्ट्रॅक्टर कदम साहेब त्याचप्रमाणे आदिवासी युवा नेते परसराम दांगट ही मंडळी उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांनी भालेराव यांचे शब्दसुमनाने त्याचप्रमाणे पुष्पहार देऊन स्वागत केले आणि त्यांना भावी कार्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या जडणघडणीमध्ये चांगल्या पद्धतीचे काम करावे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या