अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी (गंगासागर पोकळे) : संगमनेर (अहमदनगर) 18 ऑगस्ट : संगमनेर तालुक्यातील ओझर येथून मागच्या तीन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास पिंपरने मार्गे निघालेला पीक अप टेम्पो तीघांसह प्रवरा नदीत कोसळला होता. बुडालेला ‘तो’ मालवाहतूक पीक अप टेम्पो अखेर प्रवरेच्या पात्राबाहेर काढण्यात आले आहे. ठाणे आपत्ती प्रशासन दलाच्या मदतीमुळे तब्बल 50 तासानंतर यश आले आहे.
स्वातंत्र्य दिनी रात्री 8 च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाजवळ प्रवरा नदी पात्रात थेट पिकअप वाहन पडल्याची घटना घडली होती. प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले मात्र 46 तास उलटून गेल्यावर ही स्थानिक प्रशासनाला वाहन काढण्यात यश आले नाही. अखेर मुख्यमंत्री कार्यालयात ही माहिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनवेरून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण करण्यात आले
16 हजार क्यूसेक विसर्ग सुरू असलेल्या पाण्यातून 4 तास चाललेल्या ऑपरेशन नंतर वाहन बाहेर काढण्यात काल रात्री यश आले. यामध्ये वाहन चालक प्रकाश सदावर्ते यांचा मृतदेह आढळून आला आहे. एक जण मात्र अद्यापही बेपत्ता असल्याने शोध सुरू आहे. याबात अधिकमाहिती प्रांतअधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली.