धाराशिव प्रतिनिधी (विजय कानडे) दि.22 ऑगस्ट : धाराशिव तालुक्यातील तेर येथे डॉ. जयप्रकाश राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व पवनराजे फाउंडेशन च्या वतीने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास घाडगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेर येथील नागरिकांना जुने बस स्टँड तालीम समोर, तेर येथे पवनराजे फाउंडेशन च्या माध्यमातून तेर येथे सोमवार दिनांक २२/०८/२०२२ रोजी मोफत शिधापत्रिका दुरुस्ती व ई-श्रम कार्डचे शिबीर घेण्यात आले इत्यादी गावात देखिल शिबिर घेण्यात आले आहे व त्याचे देखील प्रकरणे गावोगावी जाऊन वाटप करण्यात येणार आहेत.
या शिबिरास गावातील व परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. सर्व सामन्यांच्या अडचणी व अव्हेलना लक्षात घेता खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी या मोहिमेस सुरुवात करण्याचे वचन हाती घेतले आहे. या मोहिमेत फ़ाउंडेशन च्या वतीने माहिती देण्यासाठी स्वतंत्र मोहिम राबवली जाते व त्यानंतर गावोगावी जाऊन शिबिर घेतले जातात व तहसील कार्यालयाशी संपर्क साधुन सर्व प्रकरण निकाली काढली जातात. यामुळे नगरिकांचा अमूल्य वेळ, पैसा, अव्हेलना याची बचत होत आहे त्याबद्दल नागरिक समाधानी आहेत.
याप्रसंगी तालुकाप्रमुख सतीश सोमानी, मुन्ना खटावकर, पवनराजे फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. उदयप्रकाश बाळासाहेब माकोडे, अविनाश अगाशे, अविनाश इंगळे, फैसल काझी,नामदेव कांबळे, जय कांबळे, काका राऊत, अमोल थोडसरे व पवनराजे फाउंडेशन चे कर्मचारी रोहित गुरसाळे, अविनाश कराड, श्रीकांत पवार, अतुल माने, बालाजी कांबळे निस्वार्थ पणे सर्व कामे करत आहेत.
धाराशिव तालुक्यातील कोलेगाव, गोरेवाडी, बुकनवाडी, जागजी, कोंड, पळसप, घोगरेवाडी, उपळा ( मा ), खामगाव, भडाचिवाडी, कावळेवाडी, बुकनवाडी, गोवर्धनवाडी, ढोकी इत्यादी गावमध्ये शिबिर घेण्यात आले व भविष्यात आणखी असे शासकीय कामे हाती घेतले जाणार आहेत.