प्रतिनिधी (अक्षय वरकड) :- भारताच्या महिला क्रिकेट संघात इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 सामन्यासाठी निवड झाल्याबद्दलकिरण नवगिरे यांचा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघयांच्यावतीने माळेवाडी (अकलूज )येथे जि प मुलाची शाळा नंबर 2 अकलूज माजी मुख्याध्यापक अनिल हिरालाल अन्नदाते सर यांच्या हस्ते फेटा हार शॉल श्रीफळदेऊन सन्मान करण्यात आला व किरण नवगिरे यांच्या भावाचा सत्कार अल्ताफ शेख (विजय वाडी )यांच्या हस्ते करण्यात आला माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरे हिची भारताच्या महिला क्रिकेट संघात इग्लंड दौर्यासाठी टी-२० सामन्यासाठी निवड झालेली आहे.अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवनारी किरण सोलापुरची दुसरी खेळाडु आहे.
प्रतिकुल परिस्थितीतुन श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत विविध क्रीडा स्पर्धा गाजवत पुढे पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघ, तसेच नागालँड,अरुणाचल प्रदेश कडुन खेळत सराव,सातत्य यातुन भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे.
किरणचे हे यश आपना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. खुप खुप अभिनंदन व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या या वेळेस उपस्थित मोहिते पाटील समर्थक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे (शिक्षिका )करुणा जाधव .सारिका खंडागळे तनुजा साळुंखे अनुराग खंडागळे श्रेया खंडागळे उपस्थित होते