प्रतिनिधी गंगासागर पोकळे (दिशाशक्ती न्यूज नेटवर्क) सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा (अरळी) येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच अरळी ग्रामपंचायतचे सदस्य तथा धनगर शक्ती साप्तहिकचे संपादक माननीय श्री.आकाश महादेव पुजारी यांना महाराष्ट्र ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्षपदी महाराष्ट्र ओबीसी संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कोळेकर यांच्या आदेशाने निवड करून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजभूषण श्री.आकाश पुजारी हे नेहमीच सामाजिक लढ्यात अग्रेसर असतात मेंढपाळांवर हल्ले असो किवां महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील समाजाच्या व जनतेच्या समस्या आपल्या न्यूजच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी व लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याचे कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या याच सामाजिक कार्याची नोंद घेऊन त्यांची महाराष्ट्र ओबीसी महासंघाच्यावतीने महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची वार्ता समजतात अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व पत्रकारांच्यावतीने व सर्वच स्तरावरून माननीय श्री.आकाश पुजारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.