(कोल्हापूर प्रतिनिधी) दि.24 ऑगस्ट : प्राईड ऑफ कोल्हापूर न्यूज चॅनेल यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्राईड आयकॉन पुरस्कारांचे वितरण सोहळा कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे उत्साहात संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथील भूगोल विभागातील प्रा. डॉ. बाबुराव घुरके यांना ‘प्राईड आयकॉन पुरस्कार 2022′ प्रदान करण्यात आला.
प्राइड ऑफ कोल्हापूर न्यूज चॅनेल च्या वतीने दरवर्षी कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लखनीय कार्य करणाऱ्यांना प्राइड आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात येते. याच अनुषंगाने यावर्षी प्राईड ऑफ कोल्हापूर न्यूज चॅनेल च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रा. डॉ. बाबुराव घुरके यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ विधीतज्ञ ऍडव्होकेट श्री. अरुण पाटील, ऍडव्होकेट श्री. धनंजय पठाडे साहेब आणि जेष्ठ उद्योगपती डॉ.एम. बी. शेख साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
अनेक समाजोपयोगी कामे करण्यात सतत व्यस्त असतात. अनेक शाळेत जावून गरजू, गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कपडे वाटप केले आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक ठिकाणी जावून जनजागृती केली. लोकांच्या मनातील कोरोनाविषयी असणारे गैरसमज दूर केले असून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम अविरत चालू आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील करत असलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, शिक्षक नेते श्री. दादासाहेब लाड, साप्ताहिक गरुडभरारी चे मुख्य संपादक श्री. अनिल चव्हाण, भारतीय मानवाधिकार सुरक्षा संघटन नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.महंमद यासीन शेख साहेब, श्री. सुभाष भोसले सर आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी माजी महापौर सौ.निलोफर आजरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूर शहराध्यक्ष श्री.आर.के. पोवार, मुस्लिम बोर्डिंग उपाध्यक्ष श्री.आदिल फरास, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष जाधव, युवा नेते श्री. अंजुम भाई देसाई, युवा उद्योजक श्री. इकबाल भाई बागवान, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. सुनील सामंत, प्राइड ऑफ कोल्हापूर न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक श्री. असलम नदाफ, कार्यकारी संपादक फिरोज खाटीक, सहसंपादक रियाज जैनापुरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील धनवडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Leave a reply