प्रतिनिधी (दत्तू पुरी).२६ राहुरी (अ.नगर) : भारत देश हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते. श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असून श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण शेतकऱ्यात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा होतो. बैलपोळ्याला काही भागात बेंदूर असेही नाव आहे.
शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. शहरापेक्षा खेड्यात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे बैलपोळा हा सण शेतकऱ्यांनी व रसवंतीगॄह धारकांनी मोठ्या उत्साहात बैलांची सजावट करून, पूजन करून, गावातील मुख्य प्रवेशद्वार कमानीपासून ते गावातील हनुमान मंदिर परिसरात बैलांची मिरवणूक डी.जे.च्या व ढोल ताशाच्या वाद्यांच्या आवाजात मिरवणूक काढून साजरा केला. सकाळपासूनच बैल धुण्याची तयारी व बैलांना विविध पद्धतीने सजवून हनुमान मंदिर परिसरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला गेला.
यावेळी गावातील डॉ.तोडमल, शिवाजी शेंडे, रवींद्र चौधरी, रावसाहेब बाचकर, मंगेश शेटे, विशाल निमसे, दिलीप जाधव, मनोज घोकसे, बाळासाहेब दाभाडे, दिघुजी पवार, शरद पवार, संभाजी पवार, भरत पवार, बापू पवार, पत्रकार रमेश खेमनर, शिवाजी पवार, बापू बाचकर, संदीप बाचकर, दत्तात्रय खेमनर, दत्तू पुरी, महेंद्र मराठे, रवी कोळी, अंकुश दवणे, आकाश डहाळे, राजन सूसे सह आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थीत होते.