Disha Shakti

Uncategorized

पारनेर तालुक्यातील तास येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

पारनेर प्रतिनिधी (गंगासागर पोकळे) २६ ऑगस्ट : भारतीय संस्कृतीत ॠतुनुसार वेगवेगळ्या सणांचे महत्व आहे. यामध्ये चातुर्मासात सणांची संख्या जास्त आहे त्यात नागपंचमी, राखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी यासोबतच शेतकरी वर्गात आकर्षणाचा व उत्साह भरणारा सण बैलपोळा होय.

शेतकर्यांचा निश्चिम मित्र म्हणून बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानानामुळे या मित्रांचे शेतातील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. तरीही काही शेतकर्यांना या प्राण्याबद्दल आस्था असल्याने ते त्यांची आदरपूर्वक पालनपोषण करत आहेत. अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेताना दिसतात. आज बैल पोळ्यानिमित्त पारनेर तालुक्यातील तास येथे तास येतील प्रसिद्ध गाडामालक दत्ताशेठ काळनर व भाऊसाहेब पा.काळनर या शेतकरी बांधवांनी पारंपारिक पद्धतीने ताशा सनई वाजून बैलांची मिरवणूक काढून अगदी शांतते मध्ये कार्यक्रम पार पाडला.जसा कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही हजारो वर्षापासून आपल्यासाठी राबवणाऱ्या बैलाचा हा सण पोळा बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!