राहुरी प्रतिनिधीःनाना जोशी (दिशा शक्ती नेटवर्क) : आज दिनांक 27-8-2022 रोजी राहुरी शहरातील बाल विद्यामंदिर प्रशालेमध्ये तुम्हीच बनवा तुमचा गणपती. – नुकतेच गणरायांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. राहुरी शहरातील बाल विद्यामंदिर या शाळेमध्ये तुम्हीच बनवा तुमचा गणपती याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री गुलाब मोरे सर यांनी पर्यावरणाला पूरक असलेल्या शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याचा विचार आपल्या सहकारी शिक्षकांपुढे मांडला सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेच्या आदल्या दिवशी अगदी माती आणण्यापासून त्या मातीचे गोळे करण्याचे काम शाळेचे मुख्याध्यापक तसेच सहकारी शिक्षक श्री राठोड सर, पवार सर, श्री बेल्हेकर सर, श्रीमती सविता जगताप, श्रीमती रूपाली पवार तसेच काही विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राहुरी येथील प्रसिद्ध मूर्तिकार श्री दत्तात्रय साळवे सर यांना निमंत्रित करण्यात आले. सोबतीला संगीत विशारद श्री मोरे सर हे उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला, हे छोटेसे बालचमू गणेशाची मूर्ती बनवण्यामध्ये अगदी रंगून गेले त्यांच्या सोबतीला शाळेतील शिक्षकांनी देखील सहभाग घेतला. सकाळच्या अत्यंत सुंदर व प्रसन्न अशा वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी या शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचा पूर्ण आनंद घेतला. राहुरी शहरातील अनेक नागरिकांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरमे देव सर्वकार्येषु सर्वदा अशा या गणरायाच्या कार्यशाळेच्या उपक्रमासाठी शाळेतील श्रीमती आढाव मॅडम, श्रीमती साखरे श्रीमती शेटे श्रीमती काळे श्रीमती बारसे श्रीमती पाटोळे श्रीमती श्रीमती बर्डे, श्री हेंद्रे सर श्री पवार सर श्री कवडे सर, शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती जोजारे व श्री संदीप जंगम या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी आलेल्या पाहुण्यांचे व पालकांचे श्री संदीप रासकर सर यांनी आभार मानले.
Leave a reply