Disha Shakti

Uncategorized

क्रांतीसेनेकडुन डिग्रस ग्रामपंचायतचे नवनियुक्त उपसरपंच भिंगारदेंचा सत्कार

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (दत्तू पुरी) राहुरी : तालुक्यातील डिग्रस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ज्ञानेश्वर भिंगारदे यांची नुकतीच निवड झाल्याने त्यांचा क्रांतीसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे श्री भिंगारदे हे डिग्रस सोसायटीचे संचालक ही आहेत. भिंगारदे यांचा क्रांतीसेनेच्या विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असल्याने त्यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, पेटा संघटनेचे डॉ. कौस्तुभ भागवत, गणेश येवले, ज्ञानेश्वर बाचकर, सुनिल काचोळे, रोहीत शेडगे आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!