Disha Shakti

Uncategorized

कोंढवड येथील मुळा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Spread the love

राहुरी ता.प्रतिनिधी / अशोक मंडलिक :  कोंढवड तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पुल दुरुस्तीची दीड वर्षापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळवून ही आजतागायत पुलाची दुरुस्ती न झाल्यामुळे काल मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या २५ हजार पाण्याचा विसर्गामुळे कोंढवड येथील पुलावरून पाणी वाहिल्याने मोठ्या प्रमाणात पुलाचे स्टील उघडे पडुन काही भागात स्लॅब कोसळला तर कठडे वाहुन गेले आहे.

राहुरी तालुक्यातील कोंढवड तांदूळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाचे स्टील उघडे पडुन काही ठिकाणी या पुलाचा भाग कोसळला होता. त्यावेळेस क्रांतीसेनेने वेळोवेळी पाठपुरावा करून पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या पुलावरून कोंढवड, शिलेगाव, तांदुळवाडी व आसपासच्या परिसरातील नागरिक, विद्यार्थी ये-जा करतात. या उघड्या स्टील व कोसळलेल्या भागामुळे हा पुल वाहतूकीसाठी धोकादायक बनल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता असून या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर पुल दुरूस्ती कामाची प्रशासकीय मान्यता मार्च २०२१ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध झाला असतानाही संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात केले मात्र पुलाच्या दुरुस्ती कामाकडे पुर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे पूलावरून पाणी गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सदर रस्त्याचे केलेले काम चार महिन्यांतच ठिकठिकाणी खचुन खड्डे पडल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुलाचे काम घेतलेल्या सदर ठेकेदाराने दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने धोकादायक बनलेला पुलावरून होणारी जड वाहतूक प्रशासनाच्या वतीने कामगार तलाठी, पोलीस पाटील यांनी बंद केली आहे. यामुळे कोंढवड, शिलेगाव या गावातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर पुल दुरूस्तीस का विलंब केला आहे व रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, गोरक्षनाथ म्हसे, सुरेशराव म्हसे, मच्छिंद्र पेरणे, शरद म्हसे, कडू म्हसे, बाबासाहेब माळवदे, संदीप उंडे, सचिन म्हसे, भाऊसाहेब पवार आदींनी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!