Disha Shakti

Uncategorized

युवाशक्ती ग्रामविकास संगठनेच्या पदाधिकाऱ्यांची शेगाव येथे बैठक संपन्न

Spread the love

प्रतिनिधी (रमेश खेमनर) :  महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायत बाबतींत योजनांची व निधी व ग्रामस्थांना ग्रामपंचायतबाबत जनजागृती करणारी युवाशक्ती ग्रामविकास संगठनेच्या नोंदणीला ०१ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त संघटनेने मागील संपूर्ण वर्षात केलेल्या कामाचा आढावा व संघठनेद्वारे करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन व आराखडा याबाबत महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची सभा दिनांक १० सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी श्री.क्षेत्र शेगाव येथे घेण्यात आली व दुसऱ्या दिवशी दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी युवाशक्ती ग्रामविकास संगठनच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी व सदस्य यांची सभा घेण्यात आली यामध्ये बुलढाणा, अकोला व अमरावती येथील पदाधिकारी हजर होते तसेच इतर जिल्ह्यांचे काही पदाधिकारी ऑनलाईन विडीओ कॉल व्दारे सभेला जुडलेले होते.

युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक अध्यक्ष माननीय इमरान पठाण सर यांनी सर्व सभा सदस्यांसोबत चर्चा करून प्रत्येक पदाधिकाऱ्याला आलेल्या अडचणी व मुख्य कार्यकारिणीकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले सभेमध्ये मागील वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा प्रत्येक जिल्ह्यातील सभासदांनी सविस्तर माहिती मुख्य कार्यकारिणीला दिली, तसेच तालुका कार्यकारिणी गठन करण्याबाबत चर्चा झाली.

दोन जिल्हा कार्यकारिणींमध्ये अंशतः बदल करण्यात आला, अकोला जिल्हा कार्यकारिणीत श्री महादेवभाऊ सोनटक्के यांना जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली तसेच धुळे जिल्हा संघटनेत श्री कमलेशभाऊ माळी यांना जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली.इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी याप्रमाणे फक्त एका व्हॉट्सॲप ग्रुप (ग्रामपंचायत राज) वरून सुरुवात झालेली संघटना आज पूर्ण महाराष्ट्र भर युवाशक्ती ग्रामविकास संगठन म्हणून उदयास येत आहे.

एका जिल्ह्यापासून सुरुवात होऊन ३२ जिल्ह्यामध्ये आपले सदस्य व पदाधिकारी जनसेवेचे कार्य करीत आहेत.आपल्या संघटनेची नोंदणी होऊन फक्त एक वर्ष पूर्ण झालेले आहे व या एका वर्षात आपल्या संघटनेच्या माध्यमातून बरीचशी ग्रामविकासाच्या दृष्टीकोणातुन महत्वाची असलेली कार्ये आपले सदस्य व पदाधिकारी करत आहे व समाजहितासाठी सतत झटत आहे त्याबद्दल सर्व सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन.

सदर कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष श्री इमरान पठाण सर, सचिव श्री डॉ.पुरुषोत्तम सदार, कोषाध्यक्ष श्री विनोदभाऊ हुंबे रा.सातारा, श्री हारून शहा रा. औरंगाबाद, श्री सुधीर लाडझरे रा.अमरावती, श्री रामेश्वरभाऊ सुलताने तसेच अकोला जिल्हाध्यक्ष श्री प्रशांतभाऊ नागे, महादेवभाऊ सोनटक्के, व इतर पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्याचे श्री शांतारामजी बेलोकार, श्री उमकांतजी गवई, प्रकाशभाऊ म्हात्रे, किरणभाऊ पाटील, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!