Disha Shakti

Uncategorized

तेर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत किशोरी मेळावा संपन्न

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी (विजय कानडे) : धाराशिव तालुक्यातील तेर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पतांर्गत शुक्रवार दि 16 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा पेठ येथे 14ते 18 वर्षे वयाच्या मुलिंचा किशोरी मेळावा घेण्यात आला . मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ , साविञींमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले . तेर बिटच्या पर्यवेक्षिका मनिषा पाटील यांनी किशोरी मुलिंनी कोणत्याही मोहाला बळी न पडता आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे पार पाडावी , बालविवाहास बळी न पडता स्वतः पुढे येवुन पालकांना विश्वासात घेऊन होणारे बालविवाह रोखावेत , बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली .

तेर ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डाॕ .नागनंदा मगरे यांनी किशोरी मुलिंना अरोग्य, आहार, स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले . यावेळी वेगवेगळ्या कडधान्याने किशोरी मुलीचे अतिशय सुंदर चिञ रेखाटण्यात आले होते . हा कार्यकम अंगाणवाडी क्रमांक 208 , 209 आणि 213 या? संयुक्त विद्यमाने घेण्यात आला .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिना बंडगर , अर्चना सलगर , दैवशाला ढवन , मदतनिस काशिबाई रसाळ , शेवंता सलगर , स्वाती कांबळे यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाला प्रभावती वाघमारे , अर्चना सोनवणे , रोहीनी कांबळे , सरोजा वाघमारे , रईसा बागवान , शईदा शेख , पोर्णिमा झाडे , कविता आंधळे , सुषमा सरवदे , मिरा खरात , सखुबाई पांढरे किशोरी मुली व माता यांची उपस्थीती होतीr.सुञसंचालन दैवशाला ढवन तर अभार अर्चना सलगर यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!