Disha Shakti

Uncategorized

ग्रामसेवा संघाचे कार्य कौतुकास्पद – अजित कांकरीया

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघाचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन गुंज सेवाभावी संस्थांचे मराठवाडा विभाग प्रमुख अजित कांकरीया यांनी केले ‌ तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघाच्या चौथ्या वर्धापनदिन कार्यक्रम प्रसंगी कांकरीया बोलत होते.अध्यक्षस्थानी ग्रामसेवा संघाचे अध्यक्ष अॅड.बालाजी भक्ते होते तर सरपंच नवनाथ नाईकवाडी,श्री. संत गोरोबा काका दुध संस्थेचे माजी चेअरमन पद्माकर फंड, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन कोठावळे,तेर स़ोसायटीचे माजी चेअरमन व्यंकटराव माळी,आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक नंदकिशोर तांबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक नवनाथ पांचाळ यांनी केले तर सूत्रसंचालन विलास टेळे यांनी केले तर आभार तानाजी पिंपळे मानले.

यावेळी तेर येथील माजी सैनिक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच फळझाडाचे वाटप करण्यात आले.कोरोना काळात अपंग असतानाही जिवाची पर्वा न करता जनजागृती केल्याबद्दल तेर येथील नारायण साळुंके यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी भक्ते, नवनाथ पांचाळ, तानाजी पिंपळे,विलास टेळे, केशव सलगर, माधव मगर, नरहरी बडवे,समीर बनसोडे, सारंग पिंपळे, भगवंत सौदागर,सागर भक्ते, रविंद्र शेळके, गोपाळ थोडसरे, विजयसिंह फंड,नामदेव गायके, राजेंद्र थोडसरे, प्रविण बंडे, रामेश्वर दुधाळ,शाम आंधळे यांनी परीश्रम घेतले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!