Disha Shakti

Uncategorized

धाराशिव तालुक्यातील कुंभार व्यवसायिकांना तहसील कार्यालयाचे माती उत्खनन ओळखपत्र प्रमाणपत्र वाटप

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी : विजय कानडे (दिशा शक्ती न्यूज नेटवर्क) : धाराशिव तालुक्यातील कुंभार समाजातील कुंभार व्यवसायिकांना अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाचे माती उत्खनन ओळखपत्र मिळविण्याकरता पाठपुरावा करण्यात आला त्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले, दिनांक १९ /०९/२०२२ रोजी धाराशिव तालुक्याचे तहसीलदार श्री गणेश माळी यांच्या हस्ते श्री संत गोरोबा काका यांचे प्रतिमेचे पूजन केले, त्यानंतर तहसीलदार श्री गणेश माळी व महसूल अधिकारी प्रसाद साळुंखे यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला, सत्कार समारंभ नंतर तहसील कार्यालयाचे माती उत्खननासाठी लागणारे समाजाच्या हक्काचे ओळखपत्र वाटप करण्यात आले.

त्याप्रसंगी तहसीलदार साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले की कुंभार समाजातील कारागीर आतापर्यंत आमच्यापर्यंत आले नव्हते. ते म्हणाले की तुम्ही आमच्यापर्यंत या आम्ही तुम्हाला तुमचा जो हक्क आहे तो आम्ही देऊ, साहेबांनी सांगितले की शिंदेवाडी येथील वडार समाजास आम्ही तेथे जाऊन त्यांचे ओळखपत्र वाटप केले. तर समाजातील कारागिरांना सांगितले की समाजातील नवीन युवकांनी सुद्धा या व्यवसायात उतरावे व नवीन पद्धतीने बदलत्या काळानुसार व्यवसायात सुधारणा करा आणि शासकीय योजनेचा लाभ घ्या आम्ही तुम्हाला कसली अडचण येऊ देणार नाही, महसूल अधिकारी प्रसाद साळुंके यांनी पण आपले मनोगत व मार्गदर्शन केले, नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिल्हाध्यक्ष श्री महादेवराव खटावकर वअखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व सहकार्य केले समाजातील समाज बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!