Disha Shakti

Uncategorized

स्वराज्य युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष गोविंद हनवटे यांचा शंकरनगर येथे विविध उपक्रमानी वाढदिवस साजरा

Spread the love

प्रतिनिधी / धम्मदिप  भद्रे : स्वराज्य युथ फाऊडेशन या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे नरसी व परिसरातील युवकांचे प्रेरणास्थान इंजी.गोविंददादा हनवटे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.28 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 9 वाजता रामतीर्थ (शंकरनगर) येथे रवि पाटील खतगावकर मित्रमंडळ व स्वराज्य युथ फाऊडेशन च्या वतीने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर शंकरनगर व परिसरातील पत्रकार व ऑटो चालकांचा दोन लाखाचा अपघाती विमा काढून माजी मंत्री डि.पी. सावंत व अनेक मान्यवर मंडळीच्या प्रमुख उपस्थिती ही विमा पॉलिसी प्रदान करण्यात आली या व अशा अनेक सामाजिक उपक्रमानी हनवटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

गोविंद दादा हनवटे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य फाउंडेशन मित्र मंडळ आणि रवी पाटील खतगावकर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत 28 संघाने सहभाग नोंदवला होता यात गोदावरी क्लब नांदेड या संघाने प्रथम पारितोषिक 11111 रुपये पटकावले तर फ्रेंड्स क्लब लातूर यांनी द्वितीय 5555 रुपये पारितोषिक पटकावले आणि तृतीय पारितोषिक न्यू स्टार वाढवणा येथील संघाने 3333 रुपये पारितोषिक मिळवले असूनअसून बेस्ट शूटर स्पर्धक म्हणून लातूर संघातील शोहेब शेख यांनी 1111 रुपय पारितोषिकांचे मानकरी ठरले तर बेस्ट लिफ्टर म्हणून नांदेड संघातील मनमत शिंदे यांना 1111 रुपये पारितोषिक प्रदान करण्यात आले. या विजयी संघास पारितोषिक व ट्रॉफी रवी पाटील खतगावकर यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

रामतीर्थ शंकरनगर परिसरातील पत्रकार व ऑटो चालक यांचा अपघाती दोन लाखाचा विमा काढून या पॉलिसीचे माजी मंत्री डीपी सावंत, आमदार जितेश भाऊ अंतापुरकर, माजी आमदार अमर भाऊ राजूरकर, माजी महापौर सुरजितसिंग गिल , डॉ.मिनल पाटील खतगावकर, युवा नेते रवि पाटील खतगावकर, शिवाजी पाटील पाचपिपळिकर, रामतीर्थ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे ,माथव वाघमारे,माधव कंधांरे, संतोष पुयड, संतोष दासवाड, विकास सौंडारे, गणेश पाटील आदिसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वराज्य युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गोविंद दादा हनवटे यांनी अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक भान ठेवून वाढदिवसावर इतरत्र वायफळ खर्च न होऊ देता नरसी ते शंकरनगर व शंकरनगर परिसरात चालणाऱ्या ऑटो चालकांचा आणि शंकरनगर परिसरातील सर्व पत्रकार बांधवांचा विमा काढून देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले.
गोविंद हनवटे यांचा विविध उपक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करण्यासाठी संयोजन समितीचे विकास सोंडारे, आसिफ शेख, यशवंत पाटील, संतोष दासवाड , मिलिंद बचाव, ब्रह्मा कांबळे , संजय शेरे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!