राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : दि.1 ऑक्टोबर 2022, राहुरी: शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षक अहोरात्र मेहनत घेत असतो. आशा ध्येयवादी, उपक्रमशील शिक्षकांचा कार्याचा गौरव होणे गरजचे आहे. शिक्षकांची ओळख त्यांच्या ज्ञानामुळे आणि संस्कारामुळे होते. शिक्षकाला आदर्श पुरस्कार मिळाल्यास त्यांना प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.
राहुरी येथील अमन सोशल असोसिएशनच्या वतीने आयोजित राहुरी तालुका आदर्श शिक्षक,गुणवंत शिक्षक व जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान सोहळा राहुरी येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सहकारमहर्षी डॉ.दादासाहेब तनपुरे सभागृहात संपन्न झाले.या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून डॉ.रसाळ हे बोलत होते. यावेळी डॉक्टर महानंद माने, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर, केशर उद्योग समूहाचे सागर तनपुरे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीम खान पठाण, अमन सोशल असोसिएशनचे अध्यक्ष इब्राहिम शेख, वसंतराव झावरे, रफीक शेख, ज्येष्ठ नागरिक संघाचे दगडू जाधव गुरुजी, नारायण मंगलाराम आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ .रसाळ पुढे म्हणाले की शिक्षण, आरोग्य आणि जातीय सलोख्यावर आधारलेले अमन सोशल असोसिएशनचे कार्य श्रेष्ठ आहे. प्रकाश देण्याचा व समाज घडविण्याचे काम शिक्षक करतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास केल्यास त्यांचा सन्मान होतो. स्पर्धेचे युगात शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना सखोल शिक्षण देणे गरजेचे आहे. प्रा. जितेन्द्र मेटकर यावेळी म्हणाले की सोन्याला चकाकी तर कोणीही देतो गंजलेल्या धातूला चकाकी देणे महत्त्वाचे आहे. शिक्षकांची ओळख त्यांच्या ज्ञानामुळे आणि संस्कारामुळे होणे गरजचे आहे. धर्मही जीवन जगण्याची पद्धत आहे. प्रत्येकाने आपला धर्म उंबरठ्याच्या आतच ठेवावा. भारतीय असण्याचा प्रत्येकाने अभिमान बाळगावा तिरंग्याला जपण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जल व्यवस्थापन प्रमुख डॉक्टर महानंदन माने म्हणाले की वैचारिक देवाण-घेवाण झाल्याने नवीन पिढी चांगली होते. उत्कृष्ट शिक्षकांची मांदियाळी होणे गरजेचे आहे. पुरस्कारामुळे एक दिशा मिळते यामुळे शिक्षकांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळून एक ऊर्जा मिळते. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर म्हणाले की, पालकांनी मुलाशी स्पर्धा करू नये. त्यांच्या कुवतनुसार त्यांना शिक्षण शिकू द्यावे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी शिक्षकांनी वेळ दिल्यास विद्यार्थी नक्कीच प्रगती करू शकतात. शिक्षक हा समाज घडू शकतात चांगल्या शिक्षकांमुळे विद्यार्थी पुढे यशस्वी होऊन मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यावेळी म्हणाले की शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी संधीचे संधीचे सोने करतात. शिक्षक हे देशाचे भावी नागरिक घडवितात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास त्यांच्या आयुष्यात बदल होऊन होऊ शकते. शिक्षक वर्ग हाच देशाचा भावी नागरिक ठरवीत असतो.अमन सोशल असोसिएशनची लवकरात मोठ्या वृक्षात रूपांतर होईल अशी खात्री त्यांनी यावेळी दिली.
यावेळी अमन सोशल असोसिएशनचे अध्यक्ष इब्राहिम भैयाभई शेख, राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक नारायण मंगलाराम, श्रीमती तरन्नुम खान आदींचे भाषणे झाले.पुरस्कार प्राप्त शिक्षकांना स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक समीर शेख सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन असोसिएशनचे सचिव बादशह शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अफजल पठाण, अब्दुल आतार, अजमखान पठाण, जैनुद्दीन शेख, जुरार कादरी, जिलांनी बेग, समीर शेख आदींनी परिश्रम घेतले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सहकारमहर्षी डॉ.दादासाहेब तनपुरे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास राहुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शिक्षण क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन गणेश शिंदे सर यांनी केले