अ.नगर जिल्हा प्रतिनिधि : गंगासागर पोकळे (दिशा शक्ती न्यूज नेटवर्क) दि.2 ऑक्टोबर 2022 : राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोटूंबे आखाडा गावात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे साफ दुर्लक्ष करत असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे गावात अनेक ठिकाणी सांडपाण्याची परिस्थिती बिकट असून गावातील अनेक ठिकाणी ग्रामस्थांना अक्षरक्षा रस्त्यावर सोडून देण्याची वेळ येत आहे.
ज्या ठिकाणी बंदिस्त नाल्या व गटार पूर्वीपासुन आहेत त्यांची सफाई सुध्दा ग्रामपंचायत वेळेवर करत नसल्याने त्या गटारी पॅक होऊन बंद पडल्या व फुटल्या आहेत त्यातील पाणी बाहेर पडून दुर्गंधी पसरून उग्र वास व डासांचे थैमान घातल्याने ग्रामस्थांना सहन मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी समस्यांचा पाठा वाचूनही ग्रामपंचायतने आत्तापर्यंत कोणतेही पाऊल उचललेले नाही. ग्रामपंचायत अनेक नागरिकांनी पत्र दिले आहे तर काही नागरिक ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या घरी तक्रारी घेऊन गेले तरीही कुठलीच त्यानंतर अंमलबजावणी झालेली नसून तर मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने अनेक ग्रामस्थांच्या घरात पाणी गेले असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी पाहणी करण्यास सुध्दा येऊ न शकल्याने महीला ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. तसेच ग्रामस्थांना मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने गावातील महिलांनी सरपंच यांच्या घरी जाऊन ठिय्या मांडूनही ग्रामस्थांच्या समस्यांचे निवारण होऊ शकलेले नाही. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकी दरम्यान नुसते पोकळ आश्वासने देतात व मतदानापुरते ग्रामस्थांच्या दारात येतात व निवडून आल्यावर ग्रामस्थांकडे ढोकून सुध्दा पाहत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावर गटविकास अधिकारी व राहुरीचे तहसीलदार व पंचायत समिती व जिल्हा परिषद अहमदनगर येथील अधिकाऱ्यांनी योग्य वेळी लक्ष घालून ग्रामस्थांच्या आरोग्य व इतर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे वा ग्रामपंचायतने केलेल्या कामांची व 14 व 15 वित्त आयोगाचा प्राप्त झालेल्या निधीचा वापर याबाबतीत सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.