Disha Shakti

Uncategorized

खेडचा खंडोबा पळशी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकनेते आमदार निलेशजी लंके यात्रेसाठी उपस्थित

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे (दिशा शक्ती न्यूज नेटवर्क ) धनगर समाजातील पारनेर तालुक्यातील मोठी यात्रा म्हटलं की पळशी येथील श्री क्षेत्र खेड चा खंडोबा यात्रा उत्सव या यात्रेसाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील धनगर समाज हा मोठ्या संख्येने उपस्थित राहतो. यात्रेनिमित्त धनगर समाज हा आपल्याला लाडक्या नेत्याला आमंत्रित करतो धनगर समाजाचा लोकनेते निलेश लंके यांच्यावर अफाट प्रेम आहे. त्यामुळे आमदार निलेश लंके बाकीचे कामे बाजूला ठेवून धनगर समाजासाठी शब्दाला मान देऊन उपस्थित राहतात.

धनगर बांधवांनी त्यांचे जल्लोष स्वागत केले,व शर्यतीचा शुभारंभ लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्यातील काही मान्यवर उपस्थित होते तसेच राजेंद्र चौधरी, बापूशेठ शिर्के, सरपंच राहुल झावरे, सरपंच आप्पासाहेब शिंदे, डॉ. नितीन रांधवन (सचिव पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन) देवस्थान अध्यक्ष गुलाब केसकर, गणेशजी हाके, गंगाराम बरकडे, बाळासाहेब पोकळे, लालू कोळेकर, सुभाष खामकर, बाळासाहेब बनसोडे,अनिल विधाटे यावेळी उपस्थित होते. यावेळी निलेश लंके यांनी धनगर समाजातील जी शाळाबाह्य मुल आहेत. किंवा जी मुलं शिक्षणापासून वंचित त्या मुलांकरिता शिकवण्यासाठी निलेश लंके खंबीर आहे असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

धनगर समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच प्रसिद्ध घोडा मालक भाऊ पोकळे, लहू पोकळे, पोपट बरकडे, प्रसिद्ध घोडा मालक व घोडेस्वार आनंदा बिचकुले, गुलाब केसकर, योगेश केसकर, अमोल केसकर, संतोष केसकर ,भिवा केसकर, मारुती केसकर, मल्हारी केसकर, हिरामण केसकर, संतोष बरकडे, गणेश केसकर, गजानन केसकर, मंगेश केसकर, सुभाष केसकर, आबा केसकर, बुधा केसकर, राजू तांबे, व सर्व धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!