प्रतिनिधी (गंगासागर पोकळे) : आज पारनेर तालुक्यातील पळशी येथे धनगर बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र खेडचा खंडोबा यात्रा उत्सव अतिशय उत्साहात पार पडला.या यात्रा उत्साहाला मा.सुजित झावरे पाटील यांनी भेट दिली.धनगर समाजाच्या वतीने मा.सुजित झावरे पाटील यांचा धनगरी फेटा,काठी व घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी धनगर समाजाचे नेते प्रमोद केसकर, आबा केसकर, गुलाब केसकर, भिवा केसकर, कैलास केसकर, योगेश केसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंदिराच्या विकास कामांसदर्भात तसेच धनगर बांधवांच्या अडिअडचणी सुजित झावरे पाटील यांच्याजवळ मांडल्या.तसेच पळशीचे मा.सरपंच मिठ्ठुशेठ जाधव व वनकुटेचे युवा नेते दिपक गुंजाळ यांनी देखील धनगर समाजाचे प्रश्न सुजित झावरे पाटील यांच्याजवळ मांडले.
यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की माझे वडिल स्व.मा.आमदार वसंतराव(दादा) झावरे पाटील यांच्यापासुन ते आजपर्यंत या समाजाने आमची साथ कधीच सोडली नाही. या समाजातील लोक ही खुप प्रामाणिक आहेत. तसेच तुम्ही जे काही प्रश्न मांडले आहेत ते निश्चितपणे मा.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा डॉ सुजयदादा विखे पाटील व राज्य सरकारच्या माध्यमातून यापुढील काळात देखील सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल असे प्रतिपादन त्यांनी दिले.
यावेळी मा.सरपंच मिठ्ठुशेठ जाधव,प्रमोद केसकर, दिपक गुंजाळ, गुलाब केसकर, आबा केसकर,कैलास केसकर,ऋषिकेश गागरे, योगेश केसकर, अमोल केसकर, बुधा केसकर,संतोष केसकर,राजु तांबे, निवृत्ती साळवे, बापु काळनर, संदिप पठारे,दत्ता करगळ,भिवा केसकर,मनोज केसकर,रामा कोकरे,राजु केसकर,मारुती केसकर, मल्हारी केसकर, शिवाजी सुळ,भास्कर सांबारे, रंगनाथ केसकर, हिरामण केसकर, संतोष बरकडे, संजय केसकर, बाळु केसकर,दामोधर केसकर, दौलत केसकर, गणेश केसकर, सार्थक केसकर,गजानन केसकर, पोपट केसकर,भोरबा बर्डे, भिमा केसकर, रामा घुले,संतोष करगळ,संतोष पोकळे,दिपक कोकरे,रामा केसकर, मंगेश केसकर, मल्हु बरकडे, रोहिदास बरकडे यांसह महाराष्ट्र राज्यातील असंख्य धनगर बांधव उपस्थित होते.
HomeUncategorizedपळशी येथील धनगर बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र खेडचा खंडोबा यात्रा उत्सवास मा. सुजित झावरे यांनी दर्शविली उपस्थिती
पळशी येथील धनगर बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र खेडचा खंडोबा यात्रा उत्सवास मा. सुजित झावरे यांनी दर्शविली उपस्थिती

0Share
Leave a reply