धाराशिव प्रतिनिधी ( विजय कानडे) : आखिल भारतीय विश्व हिंदू परिषद धाराशिवच्यावतीने दि.16 आॕक्टोंबर रोजी तालुक्यातील तेर येथील गोरोबा काका मंदिरातील संतधाम येथे संत विचार संमेलन भरवण्यात आले होते. संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या मुर्तीला पुष्पहार घालुन, दिप प्रज्वलन करुण संमेलनाला सुरुवात झाली. या कार्यकर्माचे उध्दघाटक परम पुज्य विद्यानंदजी सागर महाराज राधाकृष्ण अध्यात्म आश्रम गातेगावकर होते तर अध्यक्षपदी श्री.महेंद्रजी आप्पा बारगजे होते.विश्व हिंदू संघटना हिंदू संस्कृती , गोरक्षा, हिंदू समाज रक्षणासाठी जनजागृतीचे काम करते. म्हणुनच किर्तनाच्या नावाखाली किर्तनकार हाजारो रु घेतात. धर्माच्या आडुन स्वार्थी बनु नका अशाने धर्म रक्षण होणार नाही. असे परखड मत प .पु .विद्यानंदजी सागर महाराज यांनी मांडले.
कार्यक्रमाला हभप .डाॕ जनार्धन मेटे महाराज, श्री.अरुणजी नेटके, महंत तुकोजी बुवा, महंत मावजी नाथबाबा, महंत इच्छागिरी महाराज, धाराशिव विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष अॕड.गजानन चौगुले, श्रीकृष्ण धर्माधिकारी, विजयकुमार वाघमारे, श्रीमंत फंड, दत्ता मगर, सुधाकर बुकन, पप्पु फंड यांची उपस्थीती होती.सुञसंचालन कोनाले सरांनी केले. तर संमेलनाला राज्याच्या कानाकोपर्यातुन संत मंडळी मोठ्या संखेने उपस्थित होते .
Leave a reply