Disha Shakti

Uncategorized

ॲट्रॉसिटी प्रकरणात प्रहार पक्षाचे आप्पासाहेब ढूस यांना अटकपूर्वक जामीन मंजूर

Spread the love

प्रतिनिधी / प्रमोद डफळ : अहमदनगर – दि. २१/१०/२२ :- प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस व मुलगा प्रसाद ढूस यांना अहमदनगर येथील मे. सेशन कोर्टाने ॲट्रॉसिटी प्रकरणात आज अटकपूर्वक जामीन मंजूर केला आहे. देवळाली प्रवरा येथील आंतराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस व त्यांचा मुलगा प्रसाद ढूस यांनी त्यांच्या देवळाली प्रवरा येथील घरात मारहाण करून जिवे मारण्याची व जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दिनांक १२ रोजी फिर्यादीने दिली होती.

त्या फिर्यादीनुसार आप्पासाहेब ढूस व मुलगा प्रसाद यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी चा गु. र. क्रमांक 985 नुसार दाखल केला होता.त्यास आप्पासाहेब ढूस यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सल्लागार ॲड. पांडुरंग औताडे यांचे मार्फत अहमदनगर येथील मे. शेषन कोर्टात आव्हान दिले होते. त्यास आज यश आले असून मे. कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ढूस यांना आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांनी आप्पासाहेब ढूस त्यांना जमीन मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले.प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, पोलीस प्रशासन आणि न्यायदेवता यांच्यावर विश्वास असल्याचे आम्ही यापूर्वीच बोलून दाखविले होते. भारतीय नागरिकाला सत्याच्या बाजूने न्यायालयात न्याय मिळतोच त्यानुसार पुढील लढाई देखील न्यायालयातच लढावी लागेल.. व ती आम्ही सक्षमपणे लढू व न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असे आप्पासाहेब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर येथील मे. शेषन कोर्टात आप्पासाहेब ढूस यांची ॲड. पांडुरंग औताडे यांनी सक्षमपणे बाजू मांडली व त्यांना ॲड. अक्षय खाडे व ॲड. गणेश खपके यांनी सहाय्य केले. सरकार पक्ष व फिर्यादी यांच्या वतीने फिर्यादीचे वकिलांनी बाजू मांडली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!