Disha Shakti

Uncategorized

नगर मनमाड हायवेवर विद्यापीठ पेट्रोल पंपाजवळ बोलेरो-मोटरसायकलचा अपघात! अपघातात वयोवृध्द इसम गंभीर जखमी

Spread the love

प्रतिनिधीं (रमेश खेमनर) : नगर मनमाड हायवेवर राहुरी कृषि विद्यापीठाच्या पेट्रोल पंपासमोर बोलेरो व मोटरसायकल यांचा भीषण अपघातात झाला असून या अपघातात एक वयोवृध्द इसम बालकदास महाराज हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपाचाराकरिता अहमदनगर येथे हलविले आहे.

सदरील इसम खडांबे येथे कामानिमित्त गेले असता आपले काम आटपून ते राहुरीकडे नगर-मनमाड हायवेने आपल्या मोटरसायकलवर प्रवास करत असताना ते विद्यापिठाच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना भरगाव वेगात राहुरीकडून नगरच्या दिशेने चाललेल्या बोलेरो गाडीने जोराची धडक दिल्याने मोटरसायकल वरील वयोवृध्द इसम बालकदास महाराज गोलावले हे गंभीर झाले आहे. सदरील व्यक्ती मुख्य झाशी येथील रहिवासी असून ते पानेगाव मांजरी येथील चंद्रगिरी महाराज मंदिरात वास्तव्य करीत आहे अशी माहिती मिळाली  आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!