Disha Shakti

Uncategorized

पारनेर तालुक्यातील काळू नदीवरील वाहतूक ठप्प! आठ दिवसापासून वनकुटे ढवळपुरी आदिवासी बांधवांना करावा लागतो कसरतीने प्रवास.

Spread the love

पारनेर प्रतिनिधीं / गणेश पोकळे (दिशा शक्ती  न्यूज़ नेटवर्क) दि.27ऑक्टोबर : पारनेर तालुक्यातील काळू नदीवरील आठ दिवसापासून वाहतूक ठप्प झालेली असून या ठप्प वाहतुकीमुळे वनकुटे ढवळपुरी आदिवासी बांधवांना पुलावरुन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्या भागांमध्ये कोणतेही लोक प्रतिनिधीं व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तथा स्थानीक प्रशासन याबाबत कोणतीही या कामाची दखल घेत नसल्यामुळे आदिवासी बांधवांना आठ दिवसापासून ढवळपुरी ते वनकुटा कसरतीने प्रवास करावा लागत आहे. व या आदीवासी बांधवांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून हा पूल काळू नदीवरील त्या भागामध्ये कोणीही आवाज उठवणारे नसल्यामुळे या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच शेतकरी बांधवांना आठ दिवसापासून शेतीमालाची बाजार पेठात माल नेण्यासाठी वाहतूक बंद आहे. तरी या समस्या कडे गाव पुढाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे आदिवासी बांधवांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!