Disha Shakti

Uncategorizedशिक्षण विषयी

डीसले गुरुजींना नडणारे शिक्षणाधिकारी ACB च्या जाळ्यात,२५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे  : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना २५ हजारांच्या लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. रणजितसिंह डिसले यांच्या रजा प्रकरणावेळी ते चर्चेत आले होते. डिसलेंच्या रजा प्रकरणामुळं चर्चेत २५ हजारांची लाच भोवली सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला आहे.

सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. किरण लोहार यांच्या सोबतच चैतन्य भागातील एका लिपिकास यावेळी पकडण्यात आले आहे. ५० हजार रुपयांची लाच मागितली होती,तडजोडी अंती २५ हजार रुपये ठरले होते, अशी माहिती समोर आली आहे.किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण १३ महिने झाले होते. मात्र, त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती, अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात देखील त्यांच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.अखेर शिक्षणाधिकारी किरण लोहारवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वय अर्थसहाय्य शाळा आहे. त्यांच्या यू-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी यांनी २५ हजार देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पाच वाजून ४५ मिनिटांनी त्यांना २५ हजार घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

किरण लोहार कोल्हापूरमध्येही वादग्रस्त

किरण लोहार हे कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असताना देखील वादात सापडले होते. तिथं देखील त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कोल्हापूरमध्ये काम करत असताना किरण लोहार यांच्याविरोधात चौकशी समितीकडे गंभीर स्वरुपाच्या १३ लेखी तक्रारी दाखल झाल्या होत्या.त्यानंतर ते सोलापूरमध्ये रुजू झाले होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!