Disha Shakti

Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे 18 वा इंद्रधनुष्य-2022 या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन

Spread the love

प्रतिनिधी / प्रमोद डफळ : दि. 2 नोव्हेंबर, 2022, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे इंद्रधनुष्य-2022 हा 18 वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे आयोजन दि. 5 ते 9 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार, दि. 5 नोव्हेंबर, 2022 राजी सकाळी 11.00 वा महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील महोदय यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना.श्री. अब्दुल सत्तार महोदय हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमात चित्रपट अभिनेते श्री. भारत गणेशपुरे, कार्यकारी परिषद सदस्य आ.श्री. नरेंद्र दराडे, आ.श्री. किशोर दराडे, श्री. दत्तात्रय उगले, श्री. तुषार पवार, श्री. दत्तात्रय पानसरे, श्री. गणेश शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. या युवक महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील 22 विद्यापीठांमधील 1100 विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत.

यामध्ये 30 वेगवेगळ्या इव्हेंटचा समावेश असून या कार्यक्रमाचा समारोप बुधवार दि. 9 नोव्हेंबर, 2022 रोजी होणार असून सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदिय कार्यमंत्री ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील व कृषि मंत्री व प्रतिकुलपती ना.श्री. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.जी. पाटील, कुलगुरु महोदय असणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य इतर विद्यापीठातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!