Disha Shakti

Uncategorized

तेर येथील ग्रामीण रुग्णालयाचा कारभार म्हणजे “वर्कशिट” प्रमाणे कामाला दिलेली तिलांजली..?

Spread the love

(दिशा शक्ती) धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक,चार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. परंतू वर्कशिट प्रमाणे किती अधिकारी व कर्मचारी काम करतात हा संशोधनाचा विषय असून वैद्यकिय अधिक्षक व वैद्यकीय अधिकारी असे पाच अधिकारी असताना दररोज रूग्णांच्या सेवेसाठी किती वैद्यकीय अधिकारी उपस्थीत असतात याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.जे नसतात त्यांची अधिकृत रजा असते का ? वैद्यकीय अधिकारी महीन्यातून किती दिवस रूग्न सेवेचे काम करतात व किती दिवसांची पगार घेतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

वरीष्ठानी सखोल चौकशी केली तर रूग्नाची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी औषध व गोळ्या लिहून देतात ते कोणत्या वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांची तपासणी केली व गोळ्या लिहून दिल्या हे त्यांच्या हस्ताक्षरावरून लक्षात येईल व रक्त तपासणी ग्रामीण रूग्णालयात न करता खाजगी लॅबमध्ये तपासणीसाठी रुग्णांना पाठवून त्याद्वारे कमिशन घेत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तसेच व सिसीटीव्ही फुटेज पाहीले तर किती वैद्यकीय अधिकारी महीन्यातून किती दिवस काम करून रुग्णांना वैद्यकीय सेवा देतात हे लक्षात येईल.तसेच किती कर्मचारी मुख्यालयी राहाणारे व किती कर्मचारी ये-जा करतात हाही संशोधनाचा विषय आहे.

वरीष्ठांच्या दुलऺक्षामुळे सर्व कांहीं अलबेल असल्याचे दिसून येत आहे. वेळेप्रमाणे कर्मचारी येतात का?ते पूर्ण दिवस काम करतात का ? हाही संशोधनाचा विषय आहे. तेर येथील ग्रामीण रुग्णालयात एक शिपाई पद रिक्त आसून.ते कधी भरणार याकडे वरीष्ठानी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारती परीसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक व सहाय्यक संचालक आरोग्य विभाग यांनी सातत्याने तेर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेटी देऊन पाहणी व तपासणी करणे आवश्यक आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!