Disha Shakti

Uncategorized

नगर मनमाड महामार्गावरील विद्यापीठ परिसरातील धोकादायक खड्ड्यांची विद्यापीठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतली दखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधीं (दत्तू पुरी) अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला नगर मनमाड महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झालेले असून नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेकांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्या आहेत. या रोडवर वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राहुरी कृषि विद्यापीठ परिसरात जुने गेट परिसरात खूप मोठ मोठी खड्डे पडल्याने सलग गेल्या तीन दिवसापासून या खड्ड्यामध्ये गाड्या भरगाव वेगात जात असल्याने व खड्ड्याचां अंदाज येत नसल्यामुळे गाड्यांचे टायर फुटणे व अपघात होणे या वारंवार घटना घडना घडत असल्याचे विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे  यांच्या  निदर्शनास आले.

 सुरक्षा अधिकारी यांनी तात्काळ सुरक्षा पर्यवेक्षक जयेश पवार, संदीप ढसाळ, विशाल थेटे, राहुल (भाऊ) पवार, सुरक्षा कर्मचारी रेवणनाथ बेल्हेकर, राजेंद्र मगर, संपत बाचकर, सागर गवते, नवनाथ आघाव, अशोक गवते इत्यादी सुरक्षा कर्मचा-यांना तेथे पाठवून ताबडतोब खड्डे बुजविण्याचे आदेश दिले व त्या खड्ड्यामुळे विद्यापीठ परिसरात पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी खड्डे बुजविण्याच्या उपाययोजना राबविल्या आहे. सदरील खड्डे बुजविले असता नगर मनमाड मार्गावरील वाहनचालकांनी व इतर स्तरातून विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!