Disha Shakti

Uncategorized

देशाच्या हिताचे चांगले राजकारण करण्यासाठी स्वतंत्र राजकीय विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे – मोहनराव रोकडे

Spread the love

दिशा शक्ती प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षापासून सामान्य जनतेने पाहिलेले राजकारण खूप गलिच्छ होत चालले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंत दादा पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार, या सर्व मुख्यमंत्री महोदयांनी आज तागायत कधीही खालच्या पातळीवर टीका करण्याचे राजकारण केले नाही. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना वेळीच थांबवले पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये चांगले राजकारण होणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात तरुण येण्याचे धाडस करणार नाही. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल याची दक्षता घेणे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच म्हणावे वाटते देशाच्या हिताचे चांगले राजकारण करण्यासाठी स्वतंत्र राजकीय विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!