प्रतिनिधी : (दिशा शक्ती न्यूज़ नेटवर्क) नंदुरबार येथील जिल्हा संकुलात 33 व्या नाशिक परिक्षेत्रिय तायक्वांदो पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडल्या असता या स्पर्धेमध्ये एकूण 16 पोलीस स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. हा संघ राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे.या स्पर्धेत नंदुरबार, धुळे ,जळगाव, अहमदनगर, नाशिक (ग्रामीण), नाशिक (शहर) असे एकूण 6 संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत अहमदनगर पोलीस दलातील तोफखाना पोस्टेस नेमुणुकीस असलेल्या म.पो.शि. कोमल शिंदे यानी तायक्वांदो व बॉक्सिंग या खेळामध्ये सुवर्ण पदक पटकावले असून त्यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे.तसेच म.पो.ना. मनिषा निमोणकर (पोलीस मुख्यालय) यांनी बॉक्सिंग व वुशु या खेळामध्ये सुवर्ण पदक पटकावले असून त्यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. विजेत्या महीला पोलीस खेळाडूंचे एकलव्य तायक्वांदो अकॅडेमी,छत्रपती तायक्वांदो अकॅडेमी,स्वराज्य तायक्वांदो अकॅडेमी व तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अहमदनगर ने अभिनंदन केले व व पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
HomeUncategorizedनंदुरबार येथील जिल्हा संकुलात 33 व्या नाशिक परिक्षेत्रिय तायक्वांदो पोलीस क्रीडा स्पर्धेत नगरच्या कोमल व मनिषा यांना सुवर्ण पदक
नंदुरबार येथील जिल्हा संकुलात 33 व्या नाशिक परिक्षेत्रिय तायक्वांदो पोलीस क्रीडा स्पर्धेत नगरच्या कोमल व मनिषा यांना सुवर्ण पदक

0Share
Leave a reply