जिल्हा प्रतिनिधी /प्रमोद डफळ (दिशा शक्ती न्यूज़) : दिनांक ११/११/२०२२ रोजी कळवण तालुक्यातील हिंगवे गावात आदिवासी उप-योजना (TSP) भारतीय बीजशास्त्र संस्था, मऊ, उत्तरप्रदेश प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठ यांनी संशोधन केलेल्या गहू – या जातीचे फुले समाधान बियाणे सोबत जैविक खत अझोटोबॅक्टर वाटप करण्यासाठी जिल्हा नाशिक कळवण तालुक्यातील हिंगवे, गोळाखाल, गणोरे, नाळीद व ईन्शी या गावातील एकुण १७५ लाभार्थीस आधार कार्ड, ७/१२ उतारा आणि जातीचा दाखला घेऊन बियाणे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील साहेब यांच्या परवानगीने तसेच मा. डॉ. आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे, मा. डॉ. सी. बी. साळुंखे, बिजोत्पादन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. डॉ. के. सी. गागरे, सहा. बिजोत्पादन अधिकारी व डॉ. दिलीप ठाकरे, बियाणे विपणन अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री. निलेश बागुल, सरपंच व प्रमुख पाहुणे श्री.एस.एम.पाखरे साहेब, तालुका कृषी अधिकारी, मा. श्री. एस. सी. चौधरी, तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कळवण, श्री. गवळी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी सर्व शेतकरी लाभार्थींना कृषी अधिकारी यांनी कृषी योजना संबंधी मार्गदर्शन केले तसेच डॉ. गागरे यांनी बीजप्रक्रिया व गहू लागवड तंत्रज्ञान संपुर्ण माहिती दिली. सोबत श्री.बारकु, श्री. रवींद्र बहिरम, श्री. पटारे राहुरी विद्यापीठ, तसेच प्रभाकर गायकवाड, किशोर ठाकरे, ज्ञानेश्वर महाले यांचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिलीप ठाकरे यांनी केले.