धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथे बाल आनंद मेळाव्याचे शनिवार दिनांक.12 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील पालेभाज्या, फळे तसेच चहाचे हॉटेल, स्टेशनरी, किराणा, वडापाव, भेळ पाणीपुरी अशी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली होती. या आनंद मेळाव्यात जवळपास दहा ते पंधरा हजाराचा व्यवहार झाल्यामुळे , विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद,उत्साह, चिकाटी दिसत होती. मेळाव्यात परिसरातील पालक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
या आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञाना बरोबर व्यावहारिक ज्ञान, व्यापार कौशल्य व खरी कमाईची माहिती मिळणे आवश्यक असल्याचे मत सहशिक्षक यरकळसर यांनी मांडले. बालआनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विक्रम खडके, सहशिक्षक यरकर सर, पाडूळे सर, देशमुख सर ,चौरे सर, शेजाळ मॅडम, हलसिकर मॅडम, नाईक मॅडम ,मुंडे मॅडम, पांचाळ मॅडम, बंडगर मॅडम, यांनी परिश्रम घेतले.