धाराशिव प्रतिनिधी (विजय कानडे) : वीस हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले, जिल्ह्यातील राजकीय व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तेर गावच्या ग्रामपंचायतिचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर पर्यंत अर्ज भरणे ,सात डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेणे ,18 डिसेंबर रोजी मतदान , तर वीस डिसेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. मिनी मंत्रालय असलेल्या तेर ग्रामपंचायत वर गेली 40 वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील पॅनलची एक हाती सत्ता आहे. 2017 ला डॉक्टर पद्मसिंह पाटील विरोधी आघाडी पॅनलचे महादेव खटावकर जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले होते पण त्यांना अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले, १७ सदस्य संख्या असलेल्या तेर ग्रामपंचायतचे सरपंच पद एसटी महिलेसाठी आरक्षित झालेले आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देणे पक्ष हिताचे ठरेल. गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये पक्ष श्रेष्ठींचे व निरीक्षकांचे आदेश पायमल्ली तुडवून अंतर्गत गटबाजी करत उपसरपंच पदी नीता माने यांची वर्णी लागली. त्यामुळे अंतर्गत धुसफुस व गटबाजी असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू असून, गाठीभेटीचे सत्र वाढले आहे. निवडून येणाऱ्या सरपंचाकडून जनतेच्या नळाद्वारे स्वच्छ पाणी, दिवाबत्ती, गावांतर्गत रस्ते , मेन रस्त्यांना डिव्हायडर, नाल्या साफसफाई, हागणदारी मुक्त गाव , गावात सीसीटीव्ही बसवणे व गावात होत असलेल्या विविध निकृष्ट दर्जाच्या विकास कामांना आळा घालने तसेच गावात सुशिक्षित बेकार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व्यवसायासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधणे असे सर्व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याच्या अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Leave a reply