धाराशीव प्रतिनिधी/विजय कानडे : शासनाच्यावतीने दिले जाणारे दरवर्षीचे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार असे स्तरणीहाय उपक्रमशील, गुणवत्तापूर्ण सामाजिक उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांना शासनाच्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय पुरस्कार केंद्र सरकार तर्फे, तर राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र शासन देत असते. 2022 चा राष्ट्रीय पुरस्कार, जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले आहेत, मात्र राज्यस्तरीय पुरस्कार मात्र देण्यातच आले नाहीत.
या पुरस्कारासाठी शिक्षकांना विविध शासकीय विभागातील प्रमाणपत्रे तसेच ऑनलाईन, ऑफलाईन मुलाखती घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना ०५ सप्टेंबर शिक्षक दिनी दिला जाणार हा पुरस्कार शिंदे सरकारकडून पुढे ढकलण्यात आला असून, वर्ष संपत आले तरी मुख्यमंत्री शिंदे सरकारला पुरस्कार जाहीर करायला अजून मुहूर्त सापडेना महाराष्ट्रातील सुमारे १०९ आदर्श शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार होता. राज्य शासनाच्या या उदासीनतेमुळे अनेक गुणी शिक्षक मात्र नाराज झाले आहेत, जर पुरस्कार द्यायचेच नव्हते तर एवढी कठीण प्रक्रिया कशाला राबवली गेली? असा शिक्षकांचा प्रश्न आहे.राज्य शासनाने २०२२चे हे पुरस्कार लवकर जाहीर करावेत अशी शिक्षकांची अपेक्षा आहे.
Leave a reply