राहुरी प्रतिनिधी (धोंडीराम दिवे) : आज दि.१९ नोव्हेंबर २०२२ रोजी राहुरी तालुक्यातील धरणापलीकडील परिसर (अवघड क्षेत्रातील) गंगाधरवाडी व ठाकरवाडी या जि.प.प्रा.शाळेला खुशी के रंग फाउंडेशन पुणे यांच्यावतीने प्रत्येक विद्यार्थ्याला ६०० रू किमतीचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. खुशी के रंग फाउंडेशन चे सदस्य श्री निलेश शिंगे सर यांच्या हस्ते मुलांना मोफत शैक्षणिक वाटप करण्यात आले. गोरगरीब मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व भविष्यात ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे उच्चशिक्षित होऊन समाजपयोगी कार्यात सहभागी व्हावे यासाठी हे फौंडेशन दरवर्षी अनेक गरजू व उपेक्षित विद्यार्थ्यांना मदत करते.
![]()
या कार्यक्रमासाठी पुणे येथून आलेले श्री.निलेशजी शिंगे सर वावरथ गांवचे सरपंच श्री.ज्ञानेश्वर बाचकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.काशिनाथ बाचकर , उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव बाचकर, ग्रामपंचायत सदस्य अविनाश बाचकर, शिक्षण प्रेमी नागरिक श्री.गजानन बाचकर, श्री. संजय बाचकर , श्री गोरख बाचकर, गणेश बाचकर (मेजर) तसेच तारवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सालके सर, ठाकरवाडी वावरथ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खरमाळे मॅडम, सहशिक्षक श्री.डोईफोडे सर यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी सरपंच श्री.ज्ञानेश्वर बाचकर, अविनाश बाचकर, सालके सर , खरमाळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व खुशी के रंग फाउंडेशन (पुणे) हे समाजासाठी स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे योगदान देत आहे. याबद्दल निलेश शिंगे सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल विधाते सर यांनी केले व गंगाधरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.साहेबराव भनगडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले
HomeUncategorizedखुशी के रंग फाउंडेशन पुणे यांच्यावतीने गंगाधरवाडी व ठाकरवाडी (वावरथ) या शाळेला मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप
खुशी के रंग फाउंडेशन पुणे यांच्यावतीने गंगाधरवाडी व ठाकरवाडी (वावरथ) या शाळेला मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

0Share
Leave a reply