सोलापूर प्रतिनिधी / दिशा शक्ती न्यूज़ नेटवर्क : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून भारत जोडो यात्रेमध्ये पातूर ते बाळापूर, अकोला या मार्गावरील श्री.गजानन रोपवाटीका येथे मा.राहूल गांधीजी व भारत जोडो यात्रींकरिता सोलापूरी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. सदर स्टॉलमध्ये आंध्रा भजी बनवित असलेले पाहून मा.राहूल गांधीजी यांनी महिलांना विचारले की मी पण हे बनवू शकतो का अशी परवानगी घेत स्वतः भजी तळली. या स्टॉलवर कडक ज्वारीची भाकरी, कडक बाजरीची भाकरी, धपाटे, आंध्रा भजी, शेंगा चटणी, दही, खिर (हुग्गी) चा समावेश होता.
या खाद्यपदार्थांचा आस्वाद मा. राहूल गांधी जी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये घेतला व आमदार प्रणिती शिंदे आणि याकरिता राबलेल्या सर्व टीमचे कौतुक केले आणि खाद्यपदार्थ खूप सुंदर होते अशी भावना व्यक्त केली. सोलापूरील खाद्यपदार्थ बनविण्याकरीता सोलापूर येथील यल्लप्पा तुपदोळकर, शांतकुमार बलगेरी, महानंदा रामपूरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिणी शेट्टीयार व समाधान हाके यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply