Disha Shakti

Uncategorized

सुजाता इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेत यश

Spread the love

प्रतिनिधी /प्रमोद डफळ : विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते.अशाच विविध क्रीडा स्पर्धांचे जसे कबड्डी, खो-खो, क्रिकेट, रस्सीखेच, रनिंग, बॅडमिंटन रिले या खेळांचे आयोजन आरडगाव येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज येथे आयोजन करण्यात आले होते आणि विविध कॉलेज यात सहभागी झाले होते यामध्ये सुजाता कॉलेज सोनई च्या विद्यार्थ्यांनी कबड्डी या खेळप्रकारात अतिशय चांगला खेळ दाखवला यात मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

तसेच रनिंग मध्ये अनिकेत वाघ (100 मीटर व 200 मीटर) द्वितीय क्रमांक , अनिकेत पालवे ( रनिंग 100 मीटर) द्वितीय क्रमांक, संदेश सोनवणे (रनिंग 100 मीटर)चतुर्थ क्रमांक, शुभम ढाकणे (रनिंग 200 मीटर) चतुर्थ क्रमांक पटकावला तसेच मुलींमध्ये 100 मीटर रनिंग मध्ये रेणुका तऱ्हाळ व्दितीय क्रमांक तर साक्षी फाटके हिने चतुर्थ क्रमांक पटकावला तसेच बॅडमिंटन मध्ये अनिकेत पालवे याने प्रथम क्रमांक , प्रिया भवार, साक्षी फाटके, रेणुका तऱ्हाळ या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक मिळवला तसेच, रिले या सांघिक खेल प्रकारात संदेश सोनवणे, नरेश शिंदे, अनिकेत वाघ, सौरभ खिलारी या विद्यार्थ्यांनी द्वितिय क्रमांक मिळवला तसेच रस्सीखेच या सांघिक खेळात मुले व मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला विजेत्या संघांना व विद्यार्थ्यांना तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री जगदीश मुसमाडे व उपप्राचार्य श्री महेश मुसमाडे यांच्या उपस्थितीत मानचिन्ह व प्रशस्तीपत्र बक्षिसांचे वितरण करण्यात आले दरम्यान विद्यार्थ्यांना प्राचार्य सचिन चांडे यांचे मार्गदर्शन लाभले विजेत्यांना सुजाता कॉलेज चे संस्थापक श्री किरण सोनवने सर यांनी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व सुजाता स्कुल व कॉलेज च्या शिक्षक स्टाफ ने अभिनंदन केले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!