राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी ते शनी शिंगणापूर रोडवर सुरत (गुजरात) येथील मालवाहतूक ट्रक क्रमांक: GJ.19.X.7779 हा वृध्देश्वर कारखान्याहून शिंगणापूर मार्गाने सुरतला साखर गोणी घेऊन चालला असता काल (दि.22’नोव्हेंबर) रोजी रात्रीपासून तांत्रिक बिघाड होऊन स्टेरिंग लॉक झाल्याने सदरील ट्रक झाल्याने रस्त्यात उभा होता व त्या नादुरुस्त ट्रक चालकांने रस्त्यावर ट्रकच्या ठिकाणी सावधानात्म्क इशारा स्वरूपात कोणतीही उपाययोजना न केल्याने सोनई कडून शनिशिंगणापूर रस्त्याने राहुरीच्या दिशेने प्रवास करत असताना दोन मोटरसायकल स्वार तरुण भर रस्त्यात उभ्या असलेल्या त्या ट्रकचा अंधारात अंदाज न आल्याने पाठीमागून जोराची धडक दिली व दोन्ही मोटरसायकल स्वार ट्रकला आदळून खाली पडले असता दोन्ही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडले होते. त्यातील तुषार शंकर काळे या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने या तरुणाची काही वेळातच अपघातस्थळी प्राणज्योत मालवली व दूसरा तरुण गणेश बेल्हेकर या तरुणास तात्काळ उपचारासाठी अहमदनगर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदरील दोन्ही तरुण काळे आखाडा येथील रहिवासी व अत्यंत गरीब कुटुंबातील असून तुषार शंकर काळे हा तरुण अविवाहित व आई वडिलांना एकुलता एक असल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर काळे आखाडा गावात या घटनेची माहिती समजताच गावातील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे काळे आखाडा गावात शोककळा पसरली असुन अपघातातील दूसरा तरुण गणेश बेल्हेकर हा गंभीर जखमी असून त्यावर अहमदनगर येथे उपाचार चालू आहेत.
घटनेची माहिती समजताच पिंपरी अवघड गावचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लांबे, माजी सरपंच सुरेश भास्कर लांबे, पत्रकार रमेश खेमनर, अमोल लांबे, अनिल लांबे, अशोक लांबे, चंद्रशेखर लांबे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती राहुरी पोलीस स्टेशनला दिली व ॲम्बुलन्स ला संपर्क केला असता राहुरी पोलीस स्टेशनचे एकनाथ आव्हाड हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघाताची पाहणी करून लगेचच स्थानीक ग्रामस्थांच्या मदतीने घटनेतील गंभीर जखमी तरुणास ॲम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले. व मालवाहतूक ट्रक भर रस्त्यात उभा असल्याने पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी क्रेन बोलावून रस्त्यावरील मालवाहतूक ट्रक रस्त्यातून हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.
Leave a reply