कोल्हापूर प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा , नरंदे गावचे सुपुत्र , फोर्स करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष मान. डॉ. संभाजी बन्ने सर यांची इंडियन युथ स्पोर्ट्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
डॉ.संभाजी बन्ने हे फोर्स करिअर अकॅडमीच्या माध्यमातून शिवपुरी व हुपरी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भरती पूर्व प्रशिक्षण देत असतात. त्याचबरोबर ते यशवंत सेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत चेन्नई युनिव्हर्सिटी यांच्या वतीने मानद अशी डॉक्टरेट गेल्या दोन महिन्यापूर्वी बहाल करण्यात आली. त्यांच्या याच सर्व शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत इंडियन युथ स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने त्यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे हातकणंगले तालुक्यातून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
HomeUncategorizedफोर्स करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संभाजी बन्ने सर यांची इंडियन युथ स्पोर्ट्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड
फोर्स करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संभाजी बन्ने सर यांची इंडियन युथ स्पोर्ट्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड

0Share
Leave a reply