Disha Shakti

Uncategorized

महात्मा फुलेंनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी केली – बाळासाहेब खिलारी

Spread the love

प्रतिनिधी /वसंत रांधवण (अहमदनगर) : संत सावतामाळी तरुण मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. टाकळी ढोकेश्वर येथे महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेला बाळासाहेब खिलारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पत्रकार वसंत रांधवण, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, जेष्ठ पत्रकार बबनराव गायखे, भास्कर पायमोडे सर, प्रकाश केदारी सर, वसंतराव झावरे, शिंदे सर, बाळासाहेब रांधवण, सुशांत लोंढे, अविनाश रांधवण, आदित्य रांधवण, अथर्व रांधवण, राष्ट्रवादी ओ बी सी सेलचे उपाध्यक्ष मळिभाऊ रांधवण, अनिल चव्हाण, शिराज हवालदार, विराज रांधवण, आदी उपस्थित होते.

निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी म्हणाले की, सुशिक्षित समाजाची निर्मिती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झाली. शिक्षणावर ठराविक लोकांची मक्तेदारी त्यांनी मोडित काढून महिलांसह सर्वांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांनी आधुनिक व क्रांतीकारी विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!