Disha Shakti

Uncategorized

वनकुटे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! अनेक शेतकऱ्यांच्या केबली व इलेक्ट्रिक विद्युत मोटारी केल्या लंपास

Spread the love

प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : पारनेर तालुक्यातील वनकुटे व वनकुटे परिसरातील खांब ओहोळ या अनेक भागामधील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपाच्या मोटारी व केबली चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला असून अनेक ऐन कांदा व गहू अशा पिकांच्या लागवडीच्या काळात विद्युत मोटारी व केबली चोरी जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले असून आधीच शेतकरी मोठ्या संकटात असताना हे नवे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वनकुटे मुळानदी जवळील लिप्टयाच्या विहिरीतून रविवारी 27 तारखेला शेतकरी खांब ओहोळ येथील चिमा बबन पोकळे यांची पाचची मोटर व वायरिंग चोरीला गेली व रोहिदास देशमुख, बाळासाहेब नारायण शिंदे, महेंद्र एकनाथ हसे, विकास बाबुराव गागरे, बाळासाहेब मुसळे (वनकुटे) इत्यादी शेतकऱ्यांच्या अंदाजे 300 ते 400 फुट अंतरावरील मोटारीची केब ली चोरी गेल्याने वारंवार वाढत्या चोरांच्या घटनेमुळे शेतकरी ऐनवेळी पिकांच्या लागवडीच्या वेळी व लागवडी झालेल्या पिकांना पाणी देणे वेळीच चोरट्यांनी केबली व मोटारीवर डल्ला मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पोलिसांनी या टोळीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळून चोरांचा योग्य बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या मोटारी केबली चोरी जाणार नाही यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. प्रयत्न करावे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!