अहमदनगर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकश्वर येथील दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने १ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान संगीतमय श्री गुरुचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती निमित्ताने श्री क्षेत्र टाकळी ढोकेश्वर येथे संगीतमय गुरुचरित्र या कथेचा प्रारंभ गुरुवार दिनांक १ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२२ या कालावधीत गुरुचरित्र कथाकार ह. भ. प. प्रेमानंद महाराज आंबेकर शास्त्री हे असुन या संगीतमय श्री गुरुचरित्र कथेची वेळ सायंकाळी ७ ते ९:३० या वेळेमध्ये श्री दत्त मंदिरामध्ये आयोजित केलेली आहे. तरी सर्व भाविकांनी श्री गुरुचरित्र कथेचा लाभ घ्यावा.
या प्रसंगी ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ९:३० ते ११:३० रोजी देवाची आळंदी येथील ह. भ. प. रामेश्वर महाराज भोजणे यांच्या कालाच्या किर्तनाने या कथेची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी कथेसह इतर धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा सर्व ग्रामस्थ भाविक मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कमिटीच्यावतीने आग्रहाची विनंती करण्यात आली आहे.
HomeUncategorizedटाकळी ढोकेश्वर येथे संगीतमय श्री गुरुचरित्र कथेचे आयोजन! दत्त जयंती निमित्ताने दत्त मंदिरात गुरुवारपासून संगीतमय श्री गुरुचरित्र
टाकळी ढोकेश्वर येथे संगीतमय श्री गुरुचरित्र कथेचे आयोजन! दत्त जयंती निमित्ताने दत्त मंदिरात गुरुवारपासून संगीतमय श्री गुरुचरित्र

0Share
Leave a reply