Disha Shakti

Uncategorized

टाकळी ढोकेश्वर येथे जागतिक एड्स दिनानिमित्त सावली प्रतिष्ठान संचलित सावली स्कूल ऑफ नर्सिंगच्यावतीने रॅली काढून केली सामाजिक जनजागृती

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : जागतिक एड्स दिनानिमित्त सावली प्रतिष्ठान संचलित सावली स्कूल ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थीनिंनी सामाजिक जनजागृती फेरीचे आयोजन केले होते टाकळी ढोकेश्वर गावामधून ही रॅली घेण्यात आली यावेळी सावली नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

यावेळी डॉ स्वाती खिलारी म्हणाल्या कि आजही एड्स आजाराविषयी लोकांमध्ये अनेक चुकीचे गैरसमज आहेत. हा रोग संसर्गजन्य नाही , त्यामुळे आजाराने ग्रस्त लोकांसोबत जेवणे, खेळणे , राहणे, यामुळे रोगाची लागण होत नाही. काळजी घेणे हाच एड्स वर उपचार आहे. हा आजार प्रामुख्याने एच आय व्ही बाधित व्यक्तीच्या लैंगिक संपर्कातून तसेच बाधित रक्तातून पसरला जातो. यासाठी आपण स्वतः जागृत होणे गरजेचे आहे. संयम व लैंगिक सुरक्षितता ठेऊन एड्स चा प्रसार निश्चितपणे रोखता येईल. रॅली द्वारे एड्स आजाराविषयी माहिती पत्रकांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. विद्यार्थीनिनी पोस्टर व एड्स आजाराविषयी घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधले या रॅली मध्ये सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी, डॉ स्वाती खिलारी मॅडम, श्री गणेश चव्हाण, प्रा प्रशांत आल्हाट, प्राचार्य सुशांत शिंदे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. रॅली साठी प्रा, नामदेव वाळूंज, प्रा आयशा शेख, प्रा. टकले योगिता साई सावली हॉस्पिटल, खिलारी हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!