Disha Shakti

Uncategorized

राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल इंग्लिश स्कूलचे फादर जेम्स यांनी शीख धर्माचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूलचा उप प्राचार्य फादर जेम्स हा त्यांच्या शाळेतील एका १४ वर्षीय शिख धर्मीय विद्यार्थ्यांला म्हणाला कि, तू डोक्यावर घातलेली पगडी काढून टाक. आणि केस कापून शाळेतील इतर विद्यार्थ्यां प्रमाणे रहा. आमच्या धर्माचा स्वीकार कर. असे म्हणून त्याने विद्यार्थ्यांला दमदाटी केली. त्यामुळे फादरवर शिख धर्माचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आले.

राहुरी तालूक्यातील राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल येथे एक शीख धर्मीय १४ वर्षीय मुलगा नववी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर या घटनेतील आरोपी फादर जेम्स हा त्या शाळेत उप मुख्याध्यापक आहे. तो विद्यार्थी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान शाळेच्या मैदानावर होता. त्यावेळी तेथे फादर जेम्स हा आला. त्या विद्यार्थ्यांला म्हणाला कि, तुमचे शीख धर्मात दिलेल्या रितीरीवाजा प्रमाणे डोक्यावर घातलेली पगडी काढुन टाक. केस कापुन शाळेतील इतर विद्यार्थ्यां प्रमाणे रहा. आमचे धर्माचा स्वीकार कर. असे म्हणून त्याने त्या विद्यार्थ्यांला दमदाटी करुन मारहाण करण्याकरीता त्याच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी तो विद्यार्थी तेथून पळून गेला. त्याने घरी आल्यावर सदर घटना त्याच्या घरातील नातेवाईकांना सांगीतली. नातेवाईकांनी काल रात्री त्याला बरोबर घेऊन राहुरी पोलिस ठाणे गाठले. आणि घडलेला प्रकार सांगीतला. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आरोपी फादर जेम्स याला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले.

त्या विद्यार्थ्यांच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलिस ठाण्यात डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल चा उप मुख्याध्यापक फादर जेम्स याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. १२४१/२०२२ भादंवि कलम २९५ (अ), २९८, ५०६ प्रमाणे शीख धर्मीय विद्यार्थ्यांच्या धर्माचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे हे करीत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!