Disha Shakti

Uncategorized

जिल्हास्तरीय दिव्यांग मुला व मुलींचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृहाचे घवघवीत यश

Spread the love

धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे :  दि. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगाच्या मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दिनांक 2 व 3 डिसेंबर 2022 रोजी तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे आयोजित केल्या. या स्पर्धेचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी मा.शिवाजी शिंदे साहेब, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुर्यकांत भुजबळ साहेब, ग्रामीण विकास प्रकल्पाच्या प्रकल्पधिकारी मा. पी. पी. शिंदे मॅडम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौघुले यांच्या हस्ते झाले.

या स्पर्धा मूकबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, अंध या चार प्रवर्गामध्ये घेण्यात आल्या. जिल्ह्यातील दिव्यांगाच्या सर्व शाळामधुन चार प्रवर्गातील 600 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिव्या़ंगाच्या जिल्हास्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगांव संच. स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड आळणी येथील विद्यार्थिनीने विविध क्रिडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!