माढा तालुका प्रतिनिधी / संतोष पांढरे (मोडनिंब) : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या अक्षरसंस्कार गुरुकुल, देवडी तालुका-मोहोळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे झालेल्या फील्ड आर्चरी राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये गुरुकुल च्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे यश मिळवले
10 वर्षाखालील वयोगट कु.अनन्या मोहन मुळे ( 2 ब्राँझ मेडल ) 14 वर्षाखालील वयोगट चि.रणवीर मोहन मुळे (1 सिल्व्हर मेडल आणि 1 ब्राँझ मेडल) चि.आदित्य मदन मुळे (2 सिल्व्हर मेडल) चि.वेदांत रामचंद्र साळुंखे ( 1सिल्व्हर मेडल आणि 1 ब्राँझ मेडल) सर्व विजेत्यांचे व मार्गदर्शक कोच श्री.मनीष नाईकनवरे सर यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.सई डोंगरे मॅडम आणि सचिव श्री.नितीन डोंगरे सर, सोलापूर जिल्हा फील्ड आर्चरी चे सचिव. प्रा श्री. रमेश शिरसट सर व नॅशनल सेक्रेटरी मा.श्री.सुभाष नायर सर तसेच गुरुकुलचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.